बेगलुरु : गेल्या वर्षा उत्तर कर्नाटकात आलेल्या विनाशकारी पूरामुळे संकटात सापडलेल्या ऊस शेतकऱ्यांना आणखी एक धक्का बसला आहे. साखर कारखाने पूरग्रस्त ऊस खरेदी करत नसल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे.
कारखान्यांनी पूरामुळे प्रभावीत असणाऱ्या बेळगावी, बागलकोट आणि गदग या जिल्हयातील ऊस खरेदीला नकार दिला आहे. बागलकोट येथील शेतकऱ्याने सांगितले की, गाळप हंगामाचा हा दूसरा महीना आहे, पण कोणत्याही कारखान्याने आमचा ऊस खरेदी केला नाही. कारखानदार म्हणाले की, पुरामुळे ऊसाला दर्जा नाही. तर काही मालकांनी सांगितले की, पूरग्रस्त ऊस आम्ही खरेदी करत आहोत आणि फक्त अशी पिके सोडतोय जी पूर्णपणे क्षतिग्रस्त आहेत.
गेल्या वर्षा ऑगस्ट मध्ये आलेल्या भयानक पुरामुळे हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, पूरग्रस्त ऊसामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल. ज्या ऊसांमध्ये साखरेचे प्रमाण नाही असे ऊस कसे खरेदी करणार. यामुळे ऊस शेतकरी मोठया संकटात सापडले आहेत. पूरामध्ये घर आणि पिके गमावलेल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांची आशा होती. शेतकरी ऊसाची किंमत कमी करायला तयार असूनही कारखानदार ऊस घेत नाहीत. आता याबाबत सरकारने हस्तकक्षेप करणे आवश्यक आहे किंवा आधार देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदीसाठी आदेश द्यावा.