अलाहाबाद (उत्तर प्रदेश) : चीनीमंडी
जिल्ह्यातील ७४ हजार ८२६ अंत्योदय रेशन कार्ड धारकांना आता दिलासा मिळाला आहे. कारण या कार्डधारकांना
आता गहू, तांदूळ, केरोसीनसह आता साखरही कमी दरात मिळणार आहे. राज्य सरकारने गरिबांना स्वस्तात साखर
देण्याच्या आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु, साखर किती रुपये किलो दराने विकली जाईल, यावर अद्याप
सरकारने कोणताही निर्णय घेतलला नाही. अलाहाबाद जिल्ह्यातील ७४ हजार ८२६ अंत्योदय रेशन कार्ड धारकांना याचा
लाभ होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांना दोन वर्षांनंतर गरिबांची आठवण झाली आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी
तातडीने गरिबांसाठीची साखर विक्री बंद केली होती. दोन वर्षे साखर बंद केल्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांना गरिबांविषयी कणव वाटू लागली आहे. दोन वर्षांपूवी अंत्योदय कार्डधारकांना दोन किलो साखर मिळत होती. खुल्या बाजारात साखरेचा दर जास्त असल्यामुळं गरिबांना चहा पिणेही परवडणारे नव्हते. सार्वजनिक अन्न-धान्य विक्री केंद्रात साखर मिळावी, अशी मागणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर केली जात होती.
मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात अत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या ७४ हजार ८२६ आहे तर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभधारकांची संख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे. पण, अन्न सुरक्षा योजनेतील लाभधारकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्या अत्योदय कार्ड धारकांना महिन्याला धान्य मिळते. त्यांना प्रति कार्ड दोन किलो साखर देण्यात येणार आहे.
दरम्यान, अलाहाबादचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीलकुमार म्हणाले, जिल्ह्यातील अत्योदय कार्ड धारकांना लवकरच साखर उपलब्ध होईल. सार्वजनिक धान्य वितरण केंद्रांसाठी साखरेची मागणी करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात साखर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.