पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कामगार आयुक्तांनी अनुराज शुगर्सच्या कमी केलेल्या 84 कामगारांना कामावर रुजून करून घेण्याचा आदेश दिला आहे. भीमा साखर कामगार संघटनेचे 84 कामगार कामावर हजर असताना देखील त्यांना नोटीस न देता कामावरून काढून टाकल्याची तक्रार होती. भिमा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरात यांनी 84 कामगारांसह कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन सुरु केले होते.
याप्रश्नी अपर कामगार आयुक्त (पुणे विभाग) याच्या समोर 14 सप्टेंबर 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कारखान्याच्या अधिकाऱ्याएवजी टाईमकिपर उपस्थित होते. त्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भिमा साखर कामगार संघटनेच्या 84 कामगारांना तत्काळ कामावर घेण्याबाबत कारखाना प्रशासनाला पत्राद्वारे सूचना दिली. दरम्यान, याप्रकरणी पुन्हा येत्या 25 सप्टेंबर रोजी अपर कामगार आयुक्ताकडे बैठक करण्यात आली आहे.