नवी दिल्ली:भारतीय अल्कोहोलिक पेयांची जागतिक मागणी वाढत आहे. त्यामुळे कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) पुढील काही वर्षांत १ अब्ज डॉलर निर्यात महसूलाचे लक्ष्य ठेवून जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेयाला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, अपेडा भारतीय अल्कोहोलिक पेयांची परदेशातील प्रमुख ठिकाणांना निर्यात वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. अल्कोहोलिक पेयांच्या निर्यातीत भारत सध्या जगात ४० व्या क्रमांकावर आहे.
भारतीय अल्कोहोल पेयांबाबत एक ऐतिहासिक पाऊल म्हणून, गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीला राजस्थानमध्ये उत्पादित आर्टिजनल सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून इंग्लंडमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि डियाजिओ पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेब्रा क्रू, एपीईडीएचे अध्यक्ष भिषेक देव आणि एमडी हिना नागराजन यांनी संयुक्तपणे गोदावनाची पहिली खेप लॉन्च केली. ही खेप युकेला रवाना करण्यात आली.
गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीने अपेडा अंतर्गत मार्च २०२४ मध्ये लंडनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय कार्यक्रम (आयएफई) मध्ये भाग घेतला. यामध्ये गोदावनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमोशन करण्यात आले होते. ही भागीदारी यूकेमध्ये गोदावन सुरू करण्यासाठी आणि यूकेला निर्यात सुरू करण्यासाठी एक अग्रदूत म्हणून काम करते.अलवर भागातील शेतकऱ्यांना या उपक्रमामुळे मदत होणार आहे. गोदावनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सहा प्रकारच्या जवसाची स्थानिक पातळीवर खरेदी केली जाते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढण्यास मदत होते.