ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कलबुर्गी जिल्हा प्रशासन करणार ॲपचे लाँचिंग

कलबुर्गी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन लवकरच ऊस तोडणी, गाळपाबाबत सर्व माहिती देणारे मोबाईल ॲप लाँच करणार आहे. उपायुक्त यशवंत व्ही. गुरुकर यांनी ही माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना गुरुकर म्हणाले की, ऊस उत्पादकांना आपले पिक विक्री करताना अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्याय काढला आहे. ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाच्या तोडणीबाबत मागणी करू शकतात. त्यानंतर कारखाना ऊस तोडणी बाबत वेळापत्रक जारी करेल. पुढील तीन महिन्यांत ॲप लाँच केले जाणार आहे. त्यातुन पुढील गळीत हंगामात शेतकऱ्यांना मदत होईल.

प्रायोगिक तत्त्वावर अलंद तालुक्यातील भुस्नूर गावातील एनएसएल शुगर्सने ऊस गाळपाचे वेळापत्रक तयार केले आहे. कारखाना १० एप्रिलपर्यंत निम्बर्गी, अलंद, कलबुर्गी, चौडापूर, अफजलपुर, कराचगी आणि कडगांची विभागातील ९१ गावांतील ४२३९ एकर क्षेत्रातील १,२४,७६८ टन ऊसाचे गाळप करेल. सर्व कारखान्यांच्या प्रशासनांना तातडीने ऊस बिले देण्याची सूचना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन एक हेल्पलाइनही सुरू करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here