महराजगंज : सद्यस्थितीत ऊस पिकावर टॉप बोरर किडीचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. त्याला शेतकऱ्यांमध्ये पिहका किड म्हणून ओळखले जाते. या किडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत उपाय योजना करावी असे आवाहन परिसरातील साखर कारखाने आणि कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत तापमान अधिक आहे. उष्णता जादा असलेल्या या काळात ऊस पिकाला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या कालावधीत या किडींचा फैलाव गतीने होतो असे कृषी संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा प्रकारे किडींचा फैलाव आढळून आल्यास ऊस पिकावर कोराजन औषधाचे मिश्रण तयार करून त्याची फवारणी करावी असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.