शामली : जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी ०२३८ प्रजातीच्या ऊस पिकावर रोगाचा फैलाव झाला आहे. या रोगापासून बचाव व्हावा यासाठी शामली साखर कारखान्याच्या ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सल्फा गावात माजी सरपंच सत्यप्रकाश सिंह यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आ़डसाली आणि उन्हाळी ऊस लागवड ट्रेंच पद्धतीने करण्यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बैठकीत कारखान्याचे अप्पर ऊस महाव्यवस्थापक दीपक राणा यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, ऊसाची ०२३८ ही प्रजाती रोगग्रस्त झाली आहे. त्यामुळे आता नव्या वाणांचा प्रसार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी चालू हंगामात १५०२३, १४२०१, १३२३५ आणि ०११८ या प्रजातीचा ऊस लावावा. शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाची तसेच नियमित उसाची लागवड पट्टा पद्धतीने करावी. त्यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये बाहेरील केंद्रांवर अॅडव्हान्समध्ये ऊस वजन केले जाणार नाही. यावेळी कारखान्याचे उप व्यवस्थापक संजय शर्मा, फिल्ड सुपरवायझर मनमोहन शर्मा, शेतकरी सतवीर, ब्रजपाल, सहदेव, ऋषिपाल, सतेंद्र, रामपाल आदी उपस्थित होते.