आधार, जन आधार कार्ड क्रमांक नोंदवण्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

श्रीगंगानगर : शेतकऱ्यांनी आधार व जन आधार कार्डचे ऑनलाइन फिडिंग करण्याचे आवाहन राजस्थान स्टेट गंगानगर शुगर मिल्स लिमिटेडने केले आहे. जे शेतकरी ऑनलाइन नोंदणी करतील, त्यांच्या उसाचाच सर्व्हे केला जाईल, असे कारखान्याने स्पष्ट केले आहे.

‘सच कहूँ’ वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक भवानी सिंह पवार यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी ऊस विभागात जावून आपल्या आधार कार्डचा क्रमांक आणि जनआधार कार्ड याचे कम्प्युटरमध्ये ऑनलाइन लिंकिंग करावे. असे फिडिंग झाल्यावरच त्यांचा ऊस ऑनलाईन मॉड्यूल नोंदवला जाईल. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. जर शेतकऱ्यांनी ऑनलाईन फिडिंग केले नाही, तर त्यांच्या ऊसाचा सर्व्हे करणे शक्य होणार नाही, असे साखर कारखान्याने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here