ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जैविक शेतीवर भर देण्याचे आवाहन

बलरामपूर : योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादक शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात. जर साखर कारखान्याने प्रगती केली तर शेतकरीही खूश होतील. शेतकऱ्यांनी आपले शेतीतील उत्पन्न वाढीसाठी जैविक आणि नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन बलरामपूर शुगर मिल समुहाच्या मालक अवंतिका सरावगी यांनी केले. बलरामपूर साखर कारखान्याच्या मनकापूर युनिटच्या वतीने रेहरा बाजार विभागातील प्राथमिक विद्यालय सहजौरामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादन खर्चात कपात करून उत्पन्न आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बलरामपूर शुगर मिल उद्योग समुहाच्या प्रमुख अवंतिका सरावगी म्हणाल्या की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकासोबतच पूरक पिकांची निवड करावी. त्याच्या माध्यमातून ते अधिक उत्पन्न मिळवू शकतात. केंद्र सरकार जैविक तथा नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देत आहे. सरावगी यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे व्यवस्थापन, उसावरील रोग, किडींची ओळख, औषधे, प्रजाती निवड आदींबाबत सविस्तर माहिती दिली. या शेतकरी मेळाव्यात मनकापूर साखर कारखान्याचे मुख्य ऊस व्यवस्थापत नीरज बंसल, महाव्यवस्थापक उमेश सिंह बीसेन, एस. व्ही. सिंह, अनिल सिंह राठोड, हरिराम वर्मा आदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here