वेबसाइटवर नोंदणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

कॅथल : विभागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस क्षेत्राची नोंदणी माझे पीक, माझा आढावा या पोर्टलवर लवकरात लवकर करावी. यासोबतच त्याची एक प्रत जवळच्या ऊस कार्यालयात द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चौधरी यांनी सांगितले की, हरियाणा सरकारच्या निर्देशानुसार, कोणत्याही सरकारी विभागाकडून अनुदान अथवा सुविधा मिळविण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२२-२३ साठी ऊसाच्या सर्व्हेचे काम कारखान्याने पूर्ण केले आहे. यावर्षी उसाचे लागवड क्षेत्र १७,२६८.७५ एकरामध्ये आहे. यापैकी ११,६३३.५ एकर क्षेत्र खोडवा आणि ५,६३५.२५ एकर नवी लागण आहे. यामध्ये पूर्वहंगामी ऊस ८६.७८ टक्के तर उशीराचा ऊस १३.२२ टक्के आहे. गेल्या वर्षी उसाचे लागवड क्षेत्र १८,५९३ एकर होते. कारखान्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जीपीएस प्रणालीवर आधारित सर्व्हे केला आहे. त्यामुळे यामध्ये त्रुटी असण्याची शक्यता नाही.

ऊस विभागाचे व्यवस्थापक रामपाल यांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाची योग्य देखभाल करण्याचा सल्ला देताना सांगितले की, या हंगामात उसावर वेबिंग माइट नामक किडीचा फैलाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोगोर ३० ईसी ६०० मिली प्रती एकर आणि १० किलो युरीया ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यावेळी ऊस वितरण अधिकारी देशराज, निरीक्षक रामपाल सिंह व सतपाल सिंह यांच्यासह ऊस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here