अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पंतप्रधानांना आवाहन

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) खासदार बिनॉय विश्वम यांनी पंतप्रधान मोदी यांना सरकारच्या कृषी क्षेत्राला ‘शेतकरी केंद्रीत’ बनविण्याच्या आश्वासनांची आठवण करून देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली. विश्वम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर आणि मध्य भारतातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती केली. सीपीआयचे नेते विश्वम यांनी आपले पत्र लिहून पंतप्रधानांना अशा शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले, ज्यांना अलिकडेच खराब हवामानामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणासह देशातील काही भागात वादळी वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाले आहे.

विश्वम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गहू, मोहरी, हरभरा, ऊस आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या पत्रामध्ये विश्वम यांनी पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारकडे कृषी क्षेत्राला शेतकरी केंद्रीत बनविण्याच्या आपल्या आश्वासनांची आठवण करून दिली. ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की, अशा शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज दिले जावे, ज्यांचे खूप नुकसान झाले आहे. भाकप नेत्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी प्रती एकर कमीत कमी १५,००० रुपये मदत दिली जावी अशी मागणी केली. विश्वम यांनी सांगितले की, सरकार मुद्द्याला प्राधान्य देईल असे विश्वास वाटतो आणि योग्य कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here