पटना: देशामध्ये इथेनॉलसाठी संयुक्तिक धोरण बनविणारे बिहार हे पहिले राज्य आहे असे प्रतिपादन बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले. बिहारच्या नव्या इथेनॉल धोरणामुळे मक्का विक्रीचे संकट दूर होण्यासह ऊस खरेदीत सुधारणा होईल. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे मंत्र्यांनी सांगितले.
मंत्री हुसेन म्हणाले, इथेनॉल उत्पादनाने आपल्या शिथिल अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर मक्का, ऊस, खराब तांदूळ आणि सडलेल्या धान्यापासून इथेनॉलनिर्मिती सुरू करणे शक्य झाले आहे.
हुसेन यांनी सांगितले की, बिहार दरवर्षी १२००० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करते. देशातील हे सर्वात मोठे पाचव्या क्रमांकाचे इथेनॉल उत्पादक राज्य आहे. आता वीस नव्या प्रकल्पांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातून दरवर्षी ५०००० कोटी लिटर उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश प्रकल्प उत्तर बिहारमध्ये स्थापन केले जाणार आहेत असेही हुसेन म्हणाले.