नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालकपदी विजय खालकर यांची नियुक्ती करण्यात आली. हेमंत माने यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदावर संचालक मंडळाने त्यांची नियुक्ती केली आहे. खालकर यापूर्वी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा संस्थेचा बेस्ट इंडियन अॅचीवर अवॉर्ड, कार्ड फाउंडेशन व कर्मवीर माधवराव बोरस्ते ट्रस्टतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. खालकर यांच्या कार्यकाळात कादवाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण झाले होते. साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. कादवात शिकाऊ अभियंता ते प्रभारी कार्यकारी संचालकपदावर त्यांनी आतापर्यंत २८ वर्ष उत्कृष्ट काम केले आहे.