पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर केवळ दोन वर्षे दिली जाणारी मुदतवाढ आता ६५ वर्षांपर्यंत करण्यास राज्य सरकारच्या सहकार विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ते आता आणखी तीन वर्षे काम करू शकतील. मात्र, यासाठी तब्बल १२ निकष लावण्यात येणार असून, त्यांची पूर्तता झाल्यानंतरच या वाढत्या वयोमर्यादेचा लाभ देता येणार आहे.सहकारी साखर कारखान्यांत मुदतवाढ दिलेल्या कार्यकारी संचालकांना ६५ वय पूर्ण करेपर्यंत काम पाहता येणार आहे.
….या निकषांची पूर्तता आवश्यक
संबंधित कार्यकारी संचालकांविरोधात आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता चौकशी प्रस्तावित नसावी. मागील पाच वर्षांमध्ये कारखान्याच्या संचित तोट्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी नसावे.मुदतीत घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून विहित मुदतीत घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती आरोग्यदृष्ट्या सक्षम असावी.कारखाना उत्तम चालवणारी व्यक्ती असावी.