लुधियाना : लुधियाना जिल्ह्यातील गव्हाचे पेरणी क्षेत्र २०१७ नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षात राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात या धान्याचे लागवड क्षेत्र २.५२ लाख हेक्टरपासून घटून २.४३ लाख हेक्टर झाले आहे. मुख्य कृषी अधिकारी (सीएओ) डॉ. अमनजीत सिंह यांनी दि ट्रिब्यूनला सांगितले की, लुधियाना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चालू हंगामात, २०२२-२३ मध्ये २.४३ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी केली आहे. ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षात गव्हाच्या शेतीचे क्षेत्र लक्षणीयरित्या घटले आहे. शेतकऱ्यांनी इतर पर्यायी पिकांचा स्वीकार केल्याचे दिसून येते. ही पिके चांगले उत्पन्न देण्यासह पाण्याची बचत करीत आहेत.
डॉ. अमनजित सिंह यांनी सांगितले की, गव्हाच्या शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पर्यायी पिकांपासून चांगले उत्पन्न मिळविण्यात मदत होत आहे. यासोबतच पाण्याचीही बचत होईल. त्यामुळे पाण्याचा वेगाने घटणारा जमिनीतील स्तर सावरू शकतो. गव्हाच्या शेतीचा कल पाहता असे दिसून येते की, २०१५-१६ मध्ये गव्हाचे क्षेत्र २.५१ लाख हेक्टरपासून घटून २०१६-१७ मध्ये २.५ लाख हेक्टर झाले. मात्र, २०१७-१८ मध्ये गव्हाची लागवड २.५२ लाख हेक्टरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली. २०१८-१९ मध्ये ते पुन्हा घटून २.५१ लाख हेक्टरवर आले. आणि २०१९-२० मध्ये गहू २.५ लाख हेक्टर आणि २०२०-२१ मध्ये हे क्षेत्र २.४९ लाख हेक्टर, २०२१-२२ मध्ये २.४४ लाख हेक्टर आणि सध्याच्या रब्बी हंगामात २०२२-२३ मध्ये गेल्या पाच वर्षांच्या निच्चांकी स्तरावर, २.४३ लाख हेक्टरवर हे क्षेत्र आले आहे.