ब्यूनस आयर्स: अर्जेंटिनामध्ये २०२१-२२ या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन १.५५ मिलियन मेट्रिक टनापर्यंत घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर यापूर्वी, २०२०-२१ मध्ये १.८३ मिलियन मेंट्रिक टन घट दिसून आली होती.
देशात ऊस उत्पादन होणाऱ्या भागामध्ये दुष्काळामुळे घट दिसून आली आहे. यंदाच्या दुष्काळसदृश्य स्थितीमुळे उत्पादकता खालावली आहे. अर्जेंटिनाला गेल्या हंगाात झालेल्या २,४०,००० टनाच्या तुलनते २०३२१-२२ मध्ये २,२२,००० टन साखर निर्यात करण्याची अपेक्षा आहे. देशातील साखर कारखान्यांना आधीच्या वर्षाच्या तुलनेत ६.१ टक्क्यांनी कमी म्हणजेच २०२१-२२ मध्ये सुमारे २० मिलियन टन उसाचे गाळप होण्याची अपेक्षा आहे. २०२१-२२ मध्ये देशांतर्गत साखरेचा खप १.५ मिलियन टनाच्या आसपास राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.