बेळगाव :गेली सात वर्षे शेतकरी बांधव अरिहंत शुगर्ससोबत आहेत. उसाला यंदाही योग्य हमी भाव देणार आहे. यंदा कारखान्याने सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक उत्तम पाटील यांनी दिली. जैनापूर येथील अरिहंत शुगर्सच्या ७ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यंदाचा गळीत हंगाम सुमारे चार महिने चालण्याची शक्यता आहे. या कारखान्यात साखर सोडल्यास इतर कोणतेही उपपदार्थ निर्मिती केले जात नाहीत. तरीही शेतकऱ्यांना चांगला दर दिला जातो, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत मोळी पूजन करण्यात आले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिनंदन पाटील, मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य, शेतकरी बांधव, ऊस उत्पादक, कारखान्याचे सर्व पदाधिकारी यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे प्रत्येकवर्षी गळीत हंगामाला सहकार्य मिळाले आहे असे उत्तम पाटील म्हणाले. माजी आ. सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, मीनाक्षी पाटील, दीपाली पाटील, धनश्री पाटील, राजू पाटील, अरुण देसाई, शाम रेवडे, इंद्रजीत पाटील, अॅड. राजीव चौगुले, युवराज पाटील, मल्ल हवलदार, आर. के. शेट्टी, अभिजित पाटील, संजय पाटील, सतीश पाटील, दिग्विजय पाटील, केदार कुलकर्णी, राकेश चिंचणे, संदीप पाटील, निरंजन पाटील, गजानन कावडकर, सचिन बिंदगे, रवी माळी आदींससह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.