‘विघ्नहर’च्या कार्यक्षेत्रात सुमारे ९ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध : सत्यशील शेरकर

पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०२३- २४ गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. हंगाम शासनाने मंजुरी दिल्यानंतर साधारणपणे रणपणे १५ ऑक्टोबर ते १ गळीत नोव्हेंबर यादरम्यान सुरू होऊ शकतो. कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे ९ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

सत्यशील शेरकर म्हणाले कि, खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही कारखाना चालवत आहोत. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यावर आम्ही भर दिला आहे. शेरकर म्हणाले कि, यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे काही प्रमाणात उसाची कमतरता भासू शकते. ऊसतोडणीसाठी टायर बैलगाडी ७८४, ट्रॅक्टर टायर ३८०, गाडी सेंटर १५४, डोके सेंटर ६०, हार्वेस्टर ११ अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

कारखाना, डिस्टिलरी व कोजन प्रकल्प गाळप हंगाम सुरू करण्यासाठी सज्ज आहे. मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट एफआरपीनुसार २७५० रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहे. उर्वरित रकम दिवाळीत देऊन सभासदांची दिवाळी गोड करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. आगामी हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन शेरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here