कुटरे गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील कृषीदुतांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चिपळूण तालुक्यातील कुटरे गावामध्ये आगमन झाले.

हे विद्यार्थी जून ते सप्टेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहितीची देवाण घेवाण करणार आहेत. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेल्या नवनवीन जाती, विकसित तंत्रज्ञान जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कुटरे येथे भेट दिली. सदर प्रसंगी कुटरे गावचे सरपंच संजीवकुमार गुजर व उपसरपंच सुरभी जाधव आणि त्यांचे सहकारी सूर्यकांत आग्रे (सदस्य), अमरदीप कदम (सदस्य), प्रतिभा साळवी (सदस्या), समिक्षा राजेशिर्के (सदस्या), बळीराम साळुंखे (पोलीस-पाटील), प्रदीप कदम (कोतवाल), रवींद्र जाधव, संजय राजेशिर्के, बाळासाहेब राजेशिर्के, बाबुराव राजेशिर्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here