कृत्रिम बुद्धिमत्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवेल : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

सांगली : जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा राज्यातील ऊस लागवडीत प्रथमच वापर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणेल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले कि, हवामान बदलाला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ऊस लागवडीतील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प पुण्यात सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या तीन आघाडीच्या संस्थां एकत्र आल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे हा प्रयोग आता एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस लागवडीमध्ये सातत्याने पाणी आणि खतांचा वापर होत असल्याने उत्पादकता कमी होत आहे, असेही पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here