माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (66) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जेटली यांना 9 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. 1980 ते 90 च्या काळात भाजप देशाच्या राजकीय अवकाशात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होता. त्यावेळी अरुण जेटली यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून भाजपाला शिखरावर नेले. अत्यंत कमी काळात त्यांनी देशातील आघाडीचे वकील म्हणून नावलौकिक कमावला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांनी ओळख प्रस्थापित केली होती. त्यामुळे त्यांना अवघ्या एका वर्षात कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटचा ते महत्वपूर्ण हिस्सा होते.
तब्येतीच्या कारणामुळे जेटली 2019 ची लोकसभा निवडणूक नाही लढवू शकले. 2018 च्या सुरुवाती पासूनच त्यांनी कार्यालयात जाणं बंद केलं होते. 23 ऑगस्ट 2018 मध्ये ते अर्थ मंत्रालयात पुन्हा परत आले होते. जेटली यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर सारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.