अहिल्यानगर : सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी अशोक सहकारी साखर कारखान्याची सर्व यंत्रणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली सज्ज आहे. कारखान्याने सुमारे ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक साखर कारखान्याचा २०२४-२५ या ६८ व्या ऊस गळीत हंगामाचा पढेगाव गटातील ऐनतपूर येथील शेतकरी वसुंधरा सुरेश नाईक व सुरेश नाईक यांचे शेतात ऊस तोडणी शुभारंभ धुमाळ यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक यशवंत बनकर, अच्युतराव बडाख, शिवाजीराव वाबळे, भास्करराव बंगाळ, सचिन शेटे, प्रकाशराव नाईक, मच्छिंद्र भोसले, अण्णासाहेब गारडे, दादासाहेब भोसले, राजेंद्र महाले, अशोक कन्हेरकर, बाळासाहेव तागड, अनिल नाईक, हरिभाऊ काळे, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, गट प्रमुख संकेत लासुरे, अभिषेक लबडे आदींसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.