अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ काल सोमवारी (दि. २८) कारखान्याचे व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने आगामी हंगामाकरीता सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
व्हा. चेअरमन धुमाळ म्हणाले की, अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोक सहकारी साखर कारखान्याने ऑफ सिझन मधील देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करुन हंगाम निर्धारित वेळेत सुरु करण्याची तयारी केली आहे. सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस गाळपास पाठवून कारखान्यास सहकार्य करावे. यावेळी बॉयलरचे विधिवत पूजन कारखान्याचे संचालक विरेश गलांडे व त्यांच्या पत्नी ज्योतीताई तसेच कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर कष्णकांत सोनटक्के व त्यांच्या पत्नी शिवाली या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास ज्ञानदेव साळुंके, सुरेश गलांडे, कोंडीराम उंडे, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब कहांडळ,सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, डॉ. सुनीता गायकवाड, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, ज्ञानदेव पटारे, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ कासार, यशवंत बनकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.