गोंडा : आशियातील सर्वात मोठ्या इथेनॉल प्लांटची ऑगस्ट महिन्यात चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी गोंडामधील मैजापूर साखर कारखाना परिसराकील या इथेनॉल प्लांटची कोनशीला ठेवली होती. बलरामपूर शुगर मिल्स ग्रुनपने ४५५.८४ कोटी रुपये खर्चून ३५० किलो लिटर क्षमतेच्या प्लांटची स्थापना केली आहे. या प्लांटमध्ये ऊसाचा पस, साखरेचा रस, मक्का यापासून इथेनॉल उत्पादन होईल. प्लांटची स्थापना झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लखीमपूर खिरी जिल्ह्यात अवजापूर साखर कारखान्यात यापेक्षा कमी क्षमतेचा, २५० केएलपीडीचा प्लांट आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या इथेनॉल प्लांटचा लाभ ६० हजार शेतकऱ्यांना मिळेल. २५० लोकांना प्रत्यक्ष नोकरी मिळणार आहे. २६ हेक्टर जमिनीवर प्लांटची उभारणी होत आहे. १५ मेगावॅट क्षमतेच्या वीज उत्पादन केंद्राची निर्मितीही होत आहे. प्लांटची उभारणी झाल्यानंतर उत्पादन मर्यादित असल्याने साखरेचा दर स्थित राहील. दरम्यान, मैजापूर साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक पी. के. चतुर्वेदी यांनी सांगितले की, २६ एकर जागेत प्लांटची उभारणी सुरू आहे. याशिवाय कर्मचारी निवासस्थाने व इतर कामांची उभारणी सुरू आहे. जिल्हा ऊस अधिकारी ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, बलरामपूर साखर कारखाना गौंडामधील मैजापूर येथे ३५० केएल क्षमतेचा प्लांट उभारत आहे. हा आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट असेल. ऑगस्टमध्ये प्लांटची ट्रायल घेतली जाईल. याच्या उभारणीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्लांटमध्ये ऊसाचा रस आणि धान्यापासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. जवळपास ६० हजार शेतकऱ्यांचा याचा फायदा होईल.