कोरोना महामारी: आसाममध्ये बाहेरुन येणार्‍या ट्रक ड्राइव्हर आणि त्यांच्या सहकार्‍यांना स्क्रिनिंग करण्याचे आदेश

गुवाहाटी : कोरोना वायरस ला संपवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य काळजी घेत आहे. आसाममध्ये बाहेरुन येणार्‍या ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकार्‍यांना राज्याच्या सीमेवर पूर्णपणे स्क्रिनिंग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमावर्ती जिल्ह्याच्या सर्व अधिकार्‍यांना निर्देश दिले की ते कोरोना वायरस ची लक्षणे ओळखण्यासाठी राज्यात प्रवेश करणार्‍या बाहेरील ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकार्‍यांची पूर्ण स्क्रिनिंग निश्‍चित करतील.

मुख्यमंत्री सोनोवाल यांनी कोकराझार आणि धुबरी च्या अधिकार्‍यांशी बोकीरहाट आणि श्रीरामपूर प्रवेश दारवाजावर येणार्‍या ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकार्‍यांची तपासणी करण्याबाबत सांगितले. आपल्या राज्यातील लोकांचा कोरोनापासून बचाव करण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी हे पाउल उचलले आहे. त्यांनी सीमावर्ती गावामध्ये कोरोना प्रति योग्य जागरुकता अभियान सुरु करण्याबाबतही सांगितले आहे. इतर राज्यांप्रमाणे आसाममध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here