गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी सात इथेनॉल उत्पादक संस्थांच्या प्रमोटर्स सोबत बैठक घेतली. या संस्था आसाम राज्य इथेनॉल उत्पादन संवर्धन धोरण २०२१ नुसार प्लांट स्थापन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये राज्यात इथेनॉल धोरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर आसामने ३२९० कोटी रुपयांच्या १६ योजनांना मंजुरी दिली होती.
गुवाहटीमध्ये जनता भवनात मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी प्रमोटर्सनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना आपल्याला येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. सरमा यांनी सांगितले की, राज्य सरकार या धोरणानुसार योजनांच्या गतीने पुर्ततेसाठी, त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी गतीने प्रयत्न करेल. बैठकीत सात संस्था २०२३ पर्यंत जैव इंधनाची निर्मिती, व्यावसायिक उत्पादन सुरू करतील असे सांगण्यात आले.
इथेनॉल उत्पादन सुविधेसाठी, उद्योग विभागाने प्लांट स्थापन करण्यासाठीच्या आवश्यक विविध मंजुरीसाठी संस्थांसाठी सहाय्य करणारे केंद्र स्थापन केले आहे. सातपैकी सहा संस्थांनी राज्यातील विविध विभागात औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक पार्कची जमीन देण्यात आली आहे. या सात युनिटची प्रस्तावित वार्षिक क्षमता ९७० केएलडी असेल. त्यातून १०० लोकांना प्रत्यक्ष रोजगार संधी मिळेल. तर ४००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली, उद्योग आणि वाणिज्य मंत्री चंद्रमोहन पटवारी उपस्थित होते.