नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होईल. दोन्ही राज्यांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये 12 कोटींहून अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र, झारखंडमधील मतदानाचे वेळापत्रक असे…
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे (२८८ जागा)
मतदानाची तारीख: 20 नोव्हेंबर
मतमोजणी : २३ नोव्हेंबर
झारखंड – 2 टप्प्यात मतदान (81 जागा)
मतदानाच्या तारखा: 13 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर
मतमोजणी : २३ नोव्हेंबर