बीड : गाळप हंगामासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होत असल्याने विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतांसाठी तारेवरची कसरत होणार आहे. शेकडो ऊसतोड कामगारांचे स्थलांतर करत असून या कामगारांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी परत आणण्यासाठी ज्तावे लागणार आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात वडवणी व धारूर तालुक्यातून मोठ्या संख्येने मजूर ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जातात. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असल्याने ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातून तीन लाखांहून अधिक उसतोड कामगार स्थलांतर करीत असतात. गळीत हंगाम सुरु झाल्याने सध्या रोज शेकडो मजूर वाहनाने जात आहेत. जवळपास एक लाख मतदारांचे स्थलांतर होण्याचा अंदाज आहे. स्थलांतरित झालेल्या या मतदारांना शोधून आणताना निवडणुकीतील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. या स्थलांतरित कामगारांवरच या मतदारसंघातील उमेदवाराचा विजय निर्णायक मानला जातो.