शेतकरी मेळाव्यात तज्ज्ञांनी सांगितले ऊस उत्पादन वाढीचे उपाय

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश शेतकरी संस्था प्रशिक्षण केंद्र मुझफ्फरनगरच्यावतीने मन्सूरपूर ऊस समितीमध्ये शेतकरी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन वाढवणे, ऊस लावल्यानंतर होणारा किटकांचा हल्ला, रोगांपासून बचावाची माहिती देण्यात आली.

याबाबत जागरण डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांच्या हस्ते फित कापून या मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमापूर्वी ऊस समिती कार्यालय परिसरातील माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेतकरी मेळाव्यात आधुनिक कृषी यंत्रांचे प्रदर्शन करण्यात आले. त्याची माहिती देण्यात आली. यंत्रांवर शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे. संशोधकांनी शेतकऱ्यांना नव्या बियाण्याची सविस्तर माहिती दिली. ऊस विभागाचे महासंचालक बलधारी सिंह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार यांनी सर्वांचे आभार मानले. या अंतर्गत आरोग्य सेवा शिबिरही झाले. कार्यक्रमास ऊस समितीचे सचिव ब्रिजेश राय, चेअरमन मनोज कुमार, मुनेश कुमार, उत्तम वर्मा, मगन वीर राणा, ब्रजराज यादव, डॉ. पूर्वी व डॉ. मोहम्मद उस्मान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here