आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर उच्चांकी स्तरावर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

रशिया आणि युक्रेन या दरम्यानच्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. पाकिस्तान, अमेरिकेसह अनेक देशांतील पेट्रोल दर उच्चांकी स्तरावर आहेत. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल ९३ डॉलर प्रती बॅरल आहे. मात्र, भारतात गेले तीन महिने दरात बदल झालेला नाही. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही स्थिती आणखी काही काळच राहील. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंधन दरात जोरदार वाढ होऊ शकते. मार्च महिन्यात जोरदार इंधन दरवाढ अपेक्षित आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अपडेट नुसार देशाची राजधानी दिल्लीत आज, शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी पेट्रोल प्रती लिटर ९५.४१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.९८ रुपये तर डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर आहे.

देशांतर्गत बाजारात दि. ३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने इंधनावरील एक्साइज ड्यूटी कमी केली होती. तेव्हापासून दर कमी आहेत. त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात १० डॉलर प्रती बॅरल वाढ झाली आहे. तरीही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. व्हॅटमुळे इंधन दर वेगवेगळे असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दररोज दर निश्चित केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here