शाहाबाद साखर कारखान्यात अटल शेतकरी मजूर कैन्टिन सुरु

शाहाबाद: शाहाबाद साखर कारखान्यामध्ये अटल शेतकरी मजूर कैन्टीन सुरु झाले. कारखान्याचे एमडी वीरेंद्र चौधरी यांनी सोमवारी रिबन कापून याचा शुभारंभ केला. या कैन्टीन मध्ये शेतकरी आणि इतर वर्गासाठी 10 प्रति थाळी दराने स्वस्त व चांगल्या दर्जाचे अन्न उपलब्ध केले जाईल. ज्यावर 15 रुपये प्रति थाळी दराने अनुदान कारखाना देईल.

साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक वीरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, अटल शेतकरी मजूर कैन्टीन योजना प्रदेश सरकारच्या शेतकरी आणि मजुरांच्या कल्याणासाठी सुरु केलेली एक सरकारी परियोजना आहे. ज्याचा कारखान्यात ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती जास्तीत जास्त लाभ उठवू शकतील. प्रदेश सरकार च्या निर्देशानुसार अटल मजूर कैंटीन ला प्रदेशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांमध्ये सुरु केले जाईल. त्यांनी सांगितले की, शाहाबाद साखर कारखान्यामध्ये ऊस पावती वितरण प्रक्रिया कागद रहित आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना एसएमएस च्या माध्यमातून ऊस पावती वितरणाला मोबाईल वर पाठवले जाते. किसान स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून आपला ऊस कारखान्यात घालतात तसेच कारखान्याच्या काट्यावर मैनलैस प्रणाली आहे. त्यांनी सांगितले की, शाहाबाद कारखान्यामध्ये 60 केएलपीडी इथनॉल प्लांट लावण्याचे कार्य प्रगती वर आहे तसेच यामध्ये लवकरच उत्पादन सुरु होईल. गाळप हंगामा दरम्यान शेेतकऱ्यांना डीजल व पेट्रोल कारखान्याच्या पेट्रोल पंपातून तसेच खत, साखर आणि औषधे कारखाान्याच्या शेतकरी सेवा केंद्रातुन कारखान्यामध्ये घालण्यात आलेल्या ऊसानुसार उधाराने दिली जात आहे. नंतर हा निधी त्यांच्या ऊसाची थकबाकी भागवण्यातून वसुल केली जाते. यावेळी कारखान्याचे विभागाध्यक्ष तसेच मुख्य अभियंता सुभाष उपाध्याय, ऊस व्यवस्थापक जसमिद्र सिंह, मुख्य लेखाधिकारी दीपक खटोड़, कैंटीन प्रभारी मोहित गर्ग व स्थापना शाखा अधिकारी यशवीर दलाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here