नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) म्हणण्यानुसार, सध्याच्या २०२२-२३ हंगामामध्ये १५ डिसेंबर २०२२ पर्यंत साखरेचे उत्पादन ८२.१ लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी १५ डिसेंबर २०२१ रोजी ७७.९ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच या हंगामात साखरेचे उत्पादन ४ लाख टन अधिक झाले आहे. सुरू असलेल्या साखर कारखान्यांची संख्याही गेल्यावर्षीच्या समान कालावधीतील ४७९ च्या तुलनेत ४९७ झाली आहे.
या तालिकेमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेले राज्यनिहाय साखर उत्पादनाचे विवरण देण्यात आले आहे :
YTD | 15th Dec’ 2022 | 15th Dec’ 2021 | ||
ZONE | No. of operating factories | Sugar production (lac tons) | No. of operating factories | Sugar production (lac tons) |
U.P. | 116 | 20.3 | 117 | 19.8 |
Maharashtra | 193 | 33.0 | 186 | 31.9 |
Karnataka | 73 | 18.9 | 69 | 18.4 |
Gujarat | 16 | 2.6 | 15 | 2.3 |
Tamil Nadu | 17 | 1.7 | 11 | 0.6 |
Others | 82 | 5.6 | 81 | 4.9 |
ALL INDIA | 497 | 82.1 | 479 | 77.9 |
(नोट : ही साखर उत्पादनाची आकडेवारी साखरेला इथेनॉलमध्ये रुपांतरीत केल्यानंतरची आहे)
बंदरांवरील आकडेवारी आणि बाजारातील रिपोर्टनुसार, आतापर्यंत साखर निर्यातीसाठी जवळपास ४५-५० लाख टनाचे करार करण्यात आले आहेत. यापैकी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत, सद्यस्थितीत जवळपास ६ लाख टन साखर देशातून निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय, डिसेंबर महिन्यात जवळपास ८-९ लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस एकूण १५ लाख टन साखर निर्यात केली जाऊ शकते.