कोल्हापूर : अथणी शुगर लिमिटेडच्या भुदरगड युनिटच्यावतीने २०२३-२४ या हंगामातील १६ ते ३१ डिसेंबर पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत. प्रती टन ३२६६ रुपयांप्रमाणे बिले दिली आहेत अशी माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतची ऊस तोडणी, वाहतुकदारांची बिलेसुद्धा जमा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
कारखान्याने ऊस गाळप, तोडणीसाठी योग्य नियोजन केले आहे. गेल्या ६६ दिवसात १,९०,१७० मे. टन गाळप केले आहे. कारखान्याने सरासरी १०.९५ रिकव्हरीने २,०३७७५ क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. प्रत्येक पंधरवड्याची ऊस बिले कारखाना देत आहे. यापुढे सुद्धा दर पंधरवड्याची ऊस बिले वेळेवर ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केली जातील, असे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी चीफ इंजिनिअर सुरेश शिंगटे, डे. चीफ केमिस्ट प्रकाश हेद्रे, शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई, जमीर मकानदार, कन्हैया गोरे, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, अमृत कळेकर आदी उपस्थित होते.