कोल्हापूर: बांबवडे येथील अथणी शुगर्स संचलित उदय साखर कारखान्याचे पुढील गळीत हंगामात सहा लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन अथणी शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी केले. उदय साखर कारखान्यात रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड होते.
मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, यावर्षी पाऊस समाधानकारक झाला आहे. त्यामुळे गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याच्या सर्व घटकांनी प्रयत्न करावेत. काटकसरीने व काटेकोरपणे नियोजन करून गतवर्षी गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस बिलांची रक्कम एफआरपीपेक्षा जास्त दर देऊन पंधरा दिवसांत देण्याची परंपरा सुरू ठेवली जाईल. युनिट प्रमुख रवींद्र देशमुख यांनी सांगितले की, तोडणी वाहतुकीची बिल सुद्धा वेळेत देण्याची परंपरा अथणी शुगर्सकडून कायम जोपासली जाईल. गजानन जोशी यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक माजी सभापती महादेवराव पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक भगवान पाटील आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.