नवी दिल्ली: काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील उस शेतकर्यांची उस थकबाकी भागवण्याबाबत सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंकाने ट्वीट केले की, भाजपा सरकारकडे नवी संसद बनवण्यासाठी 20,000 करोड रुपये आहेत, पीएम साठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16,000 करोड रुपये आहेत. पण त्यांच्याकडे यूपी च्या उस शेतकर्यांना 14,000 करोड रुपये भागवण्यासाठी पैसे नाहीत. उत्तर प्रदेशामध्ये 2017 नंतर उस दर वाढलेला नाही. हे सरकार केवळ अरबपतींचाच विचार करते.
दरम्यान, काँग्रेस ने आरोप केला की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एफआरपी प्रणालीला नष्ट करुन शेतकर्यांना कमजोर करत आहेत. प्रधानमंत्री यांचा प्रत्येक निर्णय भांडवलदारांना फायदा मिळवून देणारा आहे. शेतकरी आता या कारस्थानाला ओळखून आहेत. शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात 26 नोव्हेंबर पासून राष्ट्रीय राजधानीच्या विविध सीमांवर शेकडो शेतकरी आंदोलन करत आहेत.