नारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न: कुमारी शैलजा

चंडीगड : हरियाणा सरकारकडून नारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान केले जात आहे असा आरोप हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एचपीसीसी) अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी केला आहे.

Uniindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार त्या म्हणाल्या, सरकारला नारायणगड साखर कारखाना सुरू ठेवायचा नाही असे दिसून येत आहे. कारखाना बंद पडल्यास कार्यक्षेत्रातील सुमारे सात हजार ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याशी संलग्न ५०० कामगारांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. हा कारखाना सुरू ठेवण्याबाबत प्रयत्न करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे घडून आलेले दिसून येत नाही.

Uniindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्या म्हणाल्या, गेल्या अनेक महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने कारखान्यातील कर्मचारी आंदोलन करीत आहेत. साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७० कोटी रुपये थकवले आहेत. आता तर कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here