पुणे : जळगाव पट्टा हा केळी आणि उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यातील उस आणि केळीला फळाचा दर्जा देण्यात यावा, अशी आमची जुनी मागणी आहे. केळी आणि उसाला फळाचा दर्जा केंद्र सरकार ने द्यावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाब पाटील यांनी सांगितले. माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांच्या केळी महामंडळ स्थापनेचे स्वप्न पूर्ण करताना राज्य सरकारने केळी महामंडळ स्थापन केले होते. महामंडळाला १०० कोटींची तरतूद केल्याचे म्हटले होते. राज्याने फळबाग लावगड योजनेतंर्गत केळीला फळांचा दर्जा दिला होता. याला अद्यापही केद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही. त्यासाठी आमचे सरकार येताच खासदार महामंडळासाठी प्रस्ताव केंद्राला सादर करतील असे त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, खानदेशातील उत्तर महाराष्ट्र महामंडळाच्या मान्यतेसाठी आमच्या खासदारांनी केंद्रात भाजपचे सरकार येताच मागणी करावी. ही विनंती आमच्या खासदारांना करणार आहे. जळगावसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रश्न गंभीर आहे. यामुळे केंद्र सरकारने खानदेशाच्या कृषी सिंचनाचा अनुशेष भरून काढायला हवा. कृषी सिंचनासाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांमध्ये जळगावसाठी देखील योजना असायला हव्यात.