कायमगंज : कायमगंज कारखान्याची डिस्टिलरी आणि इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कायमगंज सहकारी साखर कारखान्याने तोट्यातून बाहेर निघण्यासाठी आधी डिस्टिलरी आणि नंतर इथेनॉल प्लांट सुरू केला होता. साखर कारखान्याच्या रसापासून रेक्टिफाइड स्पीरीट आणि इथेनॉल उत्पादन केले जात होते.
गंगा स्वच्छता अभियानांतर्गत प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नोटिसीनंतर मार्च २०१७ मध्ये दोन्ही प्लांट बंद करण्यात आले. प्लांट बंद झाले मात्र, त्याचा खर्च सुरूच राहीला. हे प्लांट पुन्हा सुरू करण्याच्या इच्छेमुळे कारखान्याने जल प्रदूषण रोखण्यासाठी २६ कोटी रुपये खर्चून जेडएलडी प्लांट सुरू केला. त्याचे काम पूर्ण झाले नसले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे गेल्या हंगामात ३० नोव्हेंबरला डिस्टिलरी, इथेनॉल प्लांट सुरू करण्यात आला. त्यासाठी कामगार पुरवठ्याचा ठेका उत्तम एनर्जीकडे होते. डिस्टीलरीचे व्यवस्थापक आर. के. मिश्रा यांनी सांगितले की, हंगामात ३० दिवस दोन्ही प्लांट सुरू राहीले. त्यातून १३ लाख लिटर रेक्टिफाइड स्पिरीट आणि २५ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. ३१ मार्च रोजी दोन्ही प्लांट बंद झाले. आता डिस्टिलरी सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
कारखान्याचे सरव्यवस्थापक किशन लाल यांनी सांगितले की, कारखाना संघाकडून पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी सूचना मिळाल्या आहेत. २४ जूनपर्यंत निविदेची मुदत असेल. त्यानंतर डिस्टिलरी नियमीत सुरू ठेवण्याचे प्रयत्न राहतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link