पाकिस्तान सरकार कडून साखरेच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माहिती मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, सरकारने दैनंदिन उपयोगाच्या वस्तू विशेषतः गव्हाचे पीठ आणि साखरेच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि गरीबांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची योजना बनवली आहे. पंतप्रधान इमरान खान यांच्या अध्यक्षतेखाली ल महागाई आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या किमंतींबाबतच्या समीक्षा बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री फराज यांनी गेल्या सरकारवर व्यक्तिगत लाभ आणि श्रीमतांसाठी निती बनवण्याचा आरोंप केला, ज्यामुळे देशातील संस्था कमजोर झाल्या.

फराज यांनी सांगितले की, सरकार गव्हाचे पीठ , साखर आणि दैनंदिन गरजेंच्या इतर वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी हर एक प्रयत्न करत आहे. सरकार कोणत्याही किमतीवर गरजेंच्या सामानाच्या किमती कमी करेल. त्यांनी दावा केला की, प्रधानमंत्री खान यांच्या नितीचा फोकस गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणावर आहे. जे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यावर प्रभावित होतात. माहिती मंत्री फराज यांच्यानुसार, प्रधानमंत्री नियमितपणे महागाई आणि किमतींवर ब्रीफिंग करत होते. आणि ते प्रांतीय सरकारला त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी पावले उठवण्याचे निर्देश जारी करत होते. फराज यांनी सांगितले की, साखर आयात करण्याचा उद्देश त्यांच्या किमंती कमी करण्यासाठी त्यांच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याचा होता. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्र बाजारामध्ये किमती कमी करण्यासाठी साखरेची आयात करत आहेत. सरकार साखर माफियांवरही नजर ठेवून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here