डोईवाला : डोईवाला साखर कारखाना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे राज्यातील ऊस विकास राज्यमंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी सांगितले. कारखाना तोट्यात का आहे याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.
डोईवाला कारखान्याची अचानक पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या ऊस राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बगॅस हाउस, कारखान्यातील प्लान्ट, साखर गोदामाची पाहणी केली. कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रांतून ऊस वेळेवर उचल न करणाऱ्या वाहतुकदारांऐवजी नव्या वाहतूकदारांना काम द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणे, बियाणे आणि खते पुरविण्याची सूचना केली.
ऊस राज्यमंत्री म्हणाले, साखर कारखाना तोट्यातून बाहेर काढणे, शेतकऱ्यांना ऊस बिले, कर्मचाऱ्यांच्या अडचणी व इतर कारणांसाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते संजीव सैनी, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डोभाल यांनी शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांची माहिती दिली. यावेळी करण बोहरा, विनय कंडवाल, पंकज शर्मा, मनवर नेगी, वेद प्रकाश कंडवाल, सुशील जायसवाल, कोमल कनौजिया आदी उपस्थित होते.
कारखान्यातून उडणाऱ्या राखेची समस्या
खासदारांचे प्रतिनिधी रविंद्र बेलवाल यांनी कारखान्यातून उडणाऱ्या राखेमुळे स्थानिक शेतकरी हैराण झाल्याचे सांगितले. कारखान्यातील धूर, राख लगतच्या शेतकऱ्यांच्या घरात पडते. त्यामुळे वातावरण दुषित होत असल्याचे ते म्हणाले. ऊस राज्यमंत्र्यांनी मनमोहन रावत यांना याप्रश्नी तोडगा काढण्यास सांगितले.