हरिद्वार : जिल्ह्यात जवळपास सुमारे दोन लाख शेतकरी १ लाख १४ हजार हेक्टर जमिनीवर शेती करतात. ऊस हेच मुख्य नगदी पीक असल्याने येथे एकूण लागवडीच्या ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना आता ऊस लागणीच्या नव्या स्ट्रेंच (पट्टा) पद्धतीचे आकर्षण वाटू लागले आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हरिद्वार जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणावर शरद ऋतूतील ऊस लागवडीनंतर वसंत ऋतूतील लागवड केली जात आहे. आतापर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करत होते. यामध्ये उसाचे एक, दीड फुटाचे तुकडे कापून त्याचा बियाणे म्हणून वापर केला जातो. मात्र, आता यापेक्षा ऊस पेरणीची नवीन स्ट्रेंच पद्धत शेतकऱ्यांना अधिक पसंत पडू लागली आहे.