मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले अदा करण्यासाठी १० ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ५४७ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी भैसाना कारखान्याकडे सर्वाधिक ३३४ कोटी रुपये थकबाकी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस बिलांबाबत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे संचालक, ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, आठ साखर कारखान्यांनी ३२४६ कोटी रुपयांच्या उसाचे गाळप केले. त्यापैकी २६९८ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र कारखान्यांकडे अद्याप ५४७ कोटी रुपये थकले आहेत. एकूण ८३.१३ टक्के पैसे दिले गेले आहेत. खतौली कारखान्याकडे ४४ कोटी ९५ लाख, तितावी कारखआन्याकडे ४३ कोटी, मन्सूरपूर कारखान्याकडे ३८ कोटी, मोरना कारखान्याकडे ५९ कोटी, खाईखेडी कारखान्याकडे २३ कोटी आणि रोहाना कारखान्याकडे ४ कोटींची थकबाकी आहे. टिकौना कारखान्याने १०० टक्के ऊसाचे पैसे दिले आहेत.
जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी दहा ऑगस्टपर्यंत सर्व पैसे कारखान्यांनी अदा करावेत असे सख्त आदेश दिले. कारखाने टॅगिंगच्या आदेशांचे पालन करत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कारखाने १५ ऑक्टोबरपर्यंत गाळपासाठी तयार करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.