ऑस्ट्रेलिया : एनआरएने नव्या ‘साखर टॅक्स’चा प्रस्ताव फेटाळला

कॅनबेरा : नॅशनल रिटेल असोसिएशन (NRA) ने आरोग्य, वृद्ध देखभाल आणि खेल स्थायी समितीच्या अनेक शिफारशींचा विरोध केला आहे. यामध्ये विशेषत्वाने प्रस्तावीत साखर- गोड पदार्थांवरील टॅक्सचा समावेश होता. ‘एनआरए’चे आरोग्य आणि पोषण समितीचे अध्यक्ष डॉ. एलन बार्कले यांनी सांगितले की, जर या शिफारशी लागू झाल्या तर किरकोळ विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही दैनंदिन जगण्याच्या खर्चाच्या संकटाचा फटका बसेल.

डॉ. बार्कले म्हणाले की, आम्हाला माहित आहे की आमचे बरेच ग्राहक दैनंदिन जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. अनेक लहान व्यावसायिक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. आमचा विश्वास आहे की, आमच्या नेत्यांनी ग्राहकांवर नवीन कर लादण्याऐवजी किंमती आणि खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते म्हणाले की, साखर करामुळे छोट्या व्यावसायिकांपासून ते ऊस उत्पादकांपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीवर आर्थिक दबाव येण्याची शक्यता आहे. त्यातून अन्न असुरक्षितता वाढू शकते. या प्रस्तावामुळे लठ्ठपणा किंवा टाइप २ मधुमेहाचा प्रमाण कमी होईल, असा कोणताही पुरावा नसल्याचेही ते म्हणाले.

मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. बार्कले म्हणाले की, ऑस्ट्रेलियन लोक पौष्टिक पर्यायांकडे वळत आहेत. आम्ही सरकारच्या २०३० च्या राष्ट्रीय मधुमेह धोरणास समर्थन देतो, जे पौष्टिक पदार्थांना प्रोत्साहन देते आणि ग्राहकांच्या पसंतीस अग्रस्थानी ठेवते .एनआरए आरोग्यदायी ऑस्ट्रेलियासाठी अधिक चांगला मार्ग शोधण्यासाठी सरकारसोबत काम करण्याची संधी म्हणून पाहत आहे. नॅशनल रिटेल असोसिएशन ऑस्ट्रेलियामध्ये ६०,००० हून अधिक स्टोअरचे प्रतिनिधित्व करते आणि जवळपास १०० वर्षांपासून किरकोळ आणि फास्ट-फूड क्षेत्रातील व्यवसायांना सेवा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here