ऑस्ट्रेलिया : विल्मरमध्ये वेतनवाढ चर्चा पुन्हा सुरू झाल्याने कामगारांचा संप स्थगित

कॅनबेरा :ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या कारखान्यामधील युनियनने कामगारांच्या वेतनवाढीवरील चर्चा पुन्हा सुरू केल्याने संप तात्पुरता स्थगित केला आहे.ऑस्ट्रेलियाच्या उष्ण आणि दमट ईशान्य किनारपट्टीवर विल्मर शुगर आणि रिन्युएबल्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांचे गेल्या महिन्याभरात संपामुळे क्रशिंग विस्कळीत झाले आहे.विल्मरने गुरुवारी झालेल्या एका बैठकीत युनियनच्या प्रतिनिधींना सांगितले की, ते आपल्या वेतन प्रस्तावात सुधारणा करण्यासाठी तयार आहेत.त्यामुळे संघटनांनी संप थांबवण्याचे मान्य केले आहे.

ऑस्ट्रेलियन कामगार युनियनचे अधिकारी जिम विल्सन यांनी सांगितले की, आम्ही संप तूर्तास स्थगित केला आहे.जर याविषयीच्या चर्चेमध्ये कोणतीही प्रगती न झाल्यास संप पुन्हा सुरू होईल.विल्मर ऊस गाळप हंगामासाठी आपल्या आठ कारखाने सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.या दरम्यान ते नोव्हेंबररच्या आसपास पावसाळा सुरू होईपर्यंत २४ तास सुरू राहतील.गळीत हंगामादरम्यानचे आंदोलन आधीच्या तयारी आणि देखभाल कालावधीच्या तुलनेत जास्त विनाशकारी असतात.

विल्मरने सोमवारी आपला पहिला कारखाना सुरू केला.परंतु कामगारांनी एक तासासाठी कामकाज बंद करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने बुधवारी बहुतांश वेळ याला बंद करावे लागले.या आठवड्याच्या सुरुवातीला कामगारांनी कंपनीच्या वेतन प्रस्तावाला अमान्य करण्यासाठी मतदान केले.विल्मर शुगर अँड रिन्युएबल्स दरवर्षी २ दशलक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन करते, त्याची सुमारे किंमत १ अब्ज बिलियन डॉलर आहे.त्याची मालकी सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलकडे आहे.दीर्घकाळापर्यंत संपामुळे ऑस्ट्रेलियन साखर उत्पादन आणि निर्यात धोक्यात येईल, कारण पावसामुळे उसाचे गाळप करण्यासाठी उपलब्ध वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here