ऊस समित्यांना देणार ऑटोमॅटिक ऊस तोडणी मशीन : मंत्री

रुद्रपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढला जाईल. सरकार आताच कार्यरत झाले आहे. ऊस उत्पादन, समित्यांच्या स्थिती यांसह ऊस खरेदीचे पैसेही दिले जातील, असे ऊस तथा साखर उद्योग मंत्री सौरभ बहुगुणा यांनी सांगितले. यावेळी मंत्री बहुगुणा यांनी चार समित्यांना अत्याधुनिक ऑटोमॅटिक ऊस तोडणी मशीन दिले जाईल अशी घोषणा केली.

याबाबत कॅबिनेट मंत्री तथा ऊस उद्योग मंत्री सौरभ बहुगुण यांनी ऊस विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमातील स्टॉल्सना भेटी दिल्या. विभागाच्यावतीने रुद्रपूर, सितारगंज, काशीपूर आणि हल्दानी या ऊस समित्यांना ऑटोमॅटिक ऊस तोडणी मशीन दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मंत्री म्हणाले की, ऊस तोडणी मशीनद्वारे गळीत हंगामातील तोडणीच्या अडचणी दूर होतील. मशीनच्या वापराने उत्पादीत होणाऱ्या रसाची गुणवत्ता चांगली असेल. त्यावर बाहेरील धूळ वगैरे बसणार नाही. प्राथमिक टप्प्यात चार मशीन समित्यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर महिला गटांच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाईल. यातून स्वयंरोजगार वाढेल. ऑटोमॅटिक ऊस तोडणी मशीनची किंमत एक लाख ८६ हजार रुपये आहे. कार्यालयात मंत्री बहुगुणा यांनी विभागीय आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर रामपाल सिंह, आमदार शिव अरोरा यांच्यासह ऊस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here