उत्तर प्रदेशात शरद ऋतूकालीन ऊस लागवडीस प्रारंभ

निगोही : उत्तर प्रदेशात शरद ऋतूकालीन ऊस लागवडीस प्रारंभ करण्यात आला. दालमिया शुगर मिलच्यावतीने मंगळवारी रामपूर बसंत गावात शरद ऋतुकालीन उसाची लागवड करण्यात आली. खंदक पद्धतीने जास्तीत जास्त उसाची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला.

दालमिया शुगर्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर देवदत्त शर्मा यांनी शेतकरी हरवीर सिंग यांच्या शेतात वैदिक मंत्रोच्चार करत उसाची लागवड करण्यास प्रारंभ केला. या विभागातील शरद ऋतूतील उसाची पहिली लागवड करण्यास प्रारंभ केला. यावेळी शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांनी आगामी काळात उसाच्या कोएल ०११८, कोएल ९४१८४, कोएल १५०२३, कोएल १४२०१ आणि कोएल १३२३५ या प्रजातीची लागवड करावी असा सल्ला त्यांनी दिली. यावेळी साखर कारकान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक रुपलाल यांनी शेतकऱ्यांना खंदक पद्धतीने ऊस लागवड करून यामध्ये आंतरपिक घेण्याचा सल्ला दिला. अंतर पिकाद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here