अधिकाधिक ऊस उत्पादन वाढीसाठी सुधारित जातींची उपलब्धता

कोल्हापूर : राज्यातील मुख्य बागायती पिक असलेल्या उसाचे उत्पादन वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अलिकडे ऊसाच्या उत्पादनात घट दिसून येते. साखर उताराही घटत असल्याने ऊस शेती परवडत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र, शेतकऱ्यांनी उसाच्या सुधारित वाणांची लागवड केली तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

कृषीमराठी संकेतस्थळानेने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात सध्या को ७४०, को-७२१९ अर्थात संजीवनी, कोएम ७१२५ अर्थात संपदा या वाणांची शिफारस केली जात आहे. यापैकी को ७४० या जातीची सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली अशा तिन्ही हंगामात लागवड केली जाऊ शकते. राज्यात बऱ्यापैकी लागवड पाहायला मिळते. यापासून १२५ टनापर्यंत उत्पादन मिळत असले तरी ही जात उशीरा पक्व होते. खोडवा उत्पादनासाठी हे वाण ओळखले जाते.

त्याचबरोबर संजीवनी या नावाने ओळखली जाणारी को ७२१९ प्रजातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. हा ऊस लवकर काढणीस तयार होतो. पाण्याचा ताण सहन करण्यास हे वाण थोड्याफार प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. त्याचे उत्पादन १३० टनापर्यंतचे असल्याचे सांगण्यात येते. तर सुरू हंगामात लागवडीसाठी कोएम ७१२५ संपदा या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात या वाणाची लागवड पाहायला मिळते. या जातीपासून उत्तम दर्जाचा गूळ बनवला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here