हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
ऊस शेतक-यांच्या दुसर्या हप्त्याची रक्कम साखर कारखान्यांनी बँकामध्ये जमा केली आहे. परंतु शेतकर्यांना देय रक्कम देण्यास बँका विलंब करीत आहेत. पूर्णा तालुक्यात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक आहेत. या तालुक्यात वस्मतमधील पूर्णा सहकारी साखर कारखाना, गंगाखेडमधील गंगाखेड शुगर, पूर्णा येथील बलिराज साखर कारखाना आणि भाऊराव सहकारी साखर कारखान्याला यावर्षी भरपूर ऊस पाठविण्यात आला आहे. साखर कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीला उसाचे पैसे दोन ते तीन टप्प्यात देण्याचे ठरविले आहे.
पूर्णा सहकारी कारखान्याने यावर्षी ऊसाला २,१७५ रुपयांचा भाव दिला होता. यापैकी पहिला हप्ता १८७० रुपयांचा शेतकऱ्यांना मिळाला. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत टप्या-टप्याने कारखान्याकडून 320 रुपयांची दुसरा हफ्ता जमा केला जात आहे. ऊसाचा दुसरा हप्ता घेण्यासाठी शेतकरी बँकेमध्ये गर्दी करत आहेत. पण बँकेमध्ये पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतक-यांना त्रास होत आहे.