वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट कडून ऊस भूषण पुरस्कार जाहीर

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट कडून २०१८-१९ हंगामासाठी ऊस भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संपत शामराव पाटील यांना पूर्व हंगामी गटात, पुणे जिल्ह्यातील अजिंक्य बाबाजी ठाकूर यांना सुरु गटामध्ये, तर सांगलीचे जग्गनाथ रामू भगत यांना खोडवा गटात पहिला क्रमांक मिळाला आहे.

‘व्हीएसआय‘ च्या विभागीय ऊस भूषण पुरस्काराची देखील या वेळी घोषणा करण्यात आली. स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून. या मध्ये दक्षिण विभाग, उत्तर-पूर्व विभाग, आणि मध्य विभाग असे विभाग आहेत.

साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दौंड शुगरला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याला 2018-19 या वर्षाचा कै.वसंतदादा पाटील यांचा नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. अडीच लाख रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शरद, अंबालिका, मांजरा यांना उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या गटातील पुरस्कार जाहीर झाला. मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट विकास अधिकारी व उत्कृष्ट मुख्य अभियंता पुरस्कारांचीही यावेळी घोषणा करण्यात आली.

या पुरस्काराचे वितरण मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे दि. 25 डिसेंबरला (बुधवारी) सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. शरद पवार, आम. मा. श्री. अजित पवार, मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘व्हीएसआय‘ चे महासंचालक मा. श्री. शिवाजीराव देशमुख, व्हीएसआय पुणे यांनी या विविध पुरस्कारांची घोषणा केली.  यावेळी संचालक मा. श्री. विकास देशमुख (कृषीशास्त्र व तंत्रज्ञान), डॉ. दाणी आर. व्ही. (टेक्निकल एडवाइजर व साखर तंत्रज्ञान विभाग प्रमुख) यावेळी मा. श्री. एस. व्ही. पाटील (मध्यार्क व जैवइंधन), मा. श्री. राजेंद्र चांदगुडे (साखर अभियांत्रिकी), मा. श्री. जे.एन. मोहंती (आर्थिक) उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here