पिलीभीत : ऊस विभागाच्यावतीने गावागावात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये ऑनलाइन घोषणापत्र भरण्याबाबत माहिती दिली जात आहे. जर हे घोषणापत्र वेळेत भरले गेले नाही, तर शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्याला पाठवणे शक्य होणार नाही, या अटीची माहिती दिली जात आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्याभरात एलएच साखर कारखाना पिलीभीत, दि किसान सहकारी साखर कारखाना पूरनपूर, दि किसान सहकारी साखर कारखाना बिसलपूर आणि बरखेडा येथील बजाज हिंदूस्थान साखर कारखना लिमिटेडच्यावतीने ऊस खरेदी केला जातो. नव्या गळीत हंगामासाठीचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जनजागृती केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी जन सेवा केंद्रे, मोबाईल यांसह विविध माध्यमातून घोषणापत्र भरू शकतात. याची माहिती दिली जात आहे.